जय...
मी पाहिलं होतं तिला खूप खूप पूर्वी
मला पाहून ती गोड हसली होती
चिमुकल्या हातात तिच्या
माझा हात अडकला होता
इवल्याश्या हास्यात तिच्या
साऱ्या विश्वाचा आनंद होता.
निघून गेली ती आईबरोबर तिच्या
मला वाटलं भेट होणार नाही पुन्हा...
मग मी तिला विसरलो ती मला
दिवसांवर दिवस जात राहिले
वर्ष कशी गेली कळलंच नाही मला.
धाड! धाड! कानठळ्या! आक्रोश किंकाळ्या
आगीत होरपळणाऱ्या जीवांचं रडणं! मृत्यूचा तो तांडव कोणी घडवून आणला,
त्या गोंडस बाळांना गोळ्या झाडताना काहीच का वाटलं नाही त्यांना..?
धर्मरक्षक म्हणत होते स्वतःला म्हणून माणुसकीचा गळा घोटला?
सर्वांचे संसार जाळून तोडून ह्यांनी कोणता धर्म जगवला?
विचारांच्या वादळात समोरची आग शांत झाली होती
दगडासारखी माणसं माणुसकीचे अवशेष काढत होती.
तेवढ्यात मी पाहिले, काळजात धस्स झाले..
पटत नव्हते तरी जवळ जाऊन पाहिले
तीच! हो! तीच होती ती!
चिमुकले हात मोठे झाले होते
चेहऱ्यावरचे हास्य मात्र तसेच होते..
माणुसकीचं निर्मळ हास्य त्यांना
कधीच मिटवता येणार नव्हते
त्यांना हवे ते त्यांना चुकूनही मिळणार नव्हते.
विजयी मुद्रेने मी वर पाहिले...
धर्मरक्षकांचा नेहमीसाठी पराजय झाला होता
त्यांनी केलेल्या जखमेचा व्रण नाहीसा होत होता..
Thursday, May 25, 2006
Saturday, May 20, 2006
स्वप्न ...पुढे काय?
सगळे विचारतात पुढे काय करणार
डॉक्टर होणार की इंजिनिअर होणार?
मी सांगते....काय सांगते?
मी काय सांगणार! येणारा दिवसच सांगणार..
मला खूप काही करायचे आहे पण
आयुष्य खूप छोटे आहे...
मला कोणासारखं नाही व्हायचय,
मला स्वतःला सिध्द करायचयं.
मी आहे विक्षिप्त मी आहे मुर्ख
नको ते विचार करण्यातच मी गर्क..
मला शोधायचय सातवं क्षितिज
मल शोधयचाय इंद्राचा स्वर्ग
मला शोधयची आहेत आपंली मुळं
मल उठवायची आहेत समाजातली खुळं..
जागं करायचयं सर्वांना..सुजाण करायचय स्वतःला.
मला शोधायचाय 'स्व ' स्वतःतला, मला 'स्व' दाखवून द्यायचाय तुमच्यतला..
मला सगळ्यांना खुश पहायचयं,
मला तुमच्यात स्वतःला पहायचयं...
मला ना डॉक्टर ना इंजिनिअरसगळे विचारतात पुढे काय करणार
डॉक्टर होणार की इंजिनिअर होणार?
मी सांगते....काय सांगते?
मी काय सांगणार! येणारा दिवसच सांगणार..
मला खूप काही करायचे आहे पण
आयुष्य खूप छोटे आहे...
मला कोणासारखं नाही व्हायचय,
मला स्वतःला सिध्द करायचयं.
मी आहे विक्षिप्त मी आहे मुर्ख
नको ते विचार करण्यातच मी गर्क..
मला शोधायचय सातवं क्षितिज
मल शोधयचाय इंद्राचा स्वर्ग
मला शोधयची आहेत आपंली मुळं
मल उठवायची आहेत समाजातली खुळं..
जागं करायचयं सर्वांना..सुजाण करायचय स्वतःला.
मला शोधायचाय 'स्व ' स्वतःतला, मला 'स्व' दाखवून द्यायचाय तुमच्यतला..
मला सगळ्यांना खुश पहायचयं,
मला तुमच्यात स्वतःला पहायचयं...
ना पत्रकार ना चित्रकार
ह्या सर्वांच मिळून काहीतरी बनायचय..
मला नकोयत पुस्तकं आणि वह्या
निरर्थक आकडेमोड आणि माहिती
मला असं शिक्षण द्या जे माणूस बनवेल सर्वांना.
पोट भरायला शिकायचयं का स्वतःला शोधायला शिकायचय?
मी पैसे कमवायला शिकणार? पैसे कमवून सुखी होणार?
सुखी झाले तर स्वप्नांचं काय होणार..
तो स्वर्ग, ते सातवं क्षितिज सगळं धुळ होणार...
असच सगळे जगत असतात
मीही कदचित असच जगेन
उद्या कोणी पाहिला आहे....
असेल तर खरं काय होणार ...खरंच कोणी सांगेल...
Madhura...
Subscribe to:
Posts (Atom)